देश

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात!

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आणि नवे कायदे मागे घेण्याची मागणी करत मोर्चा काढला जाणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखला.

काँग्रेस नेत्यांनी 10 जनपथ येथे रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. पोलिसांनी कारवाई करत ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलं.

पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली.

पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड सुरू केल्याने आंदोलकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी फरफटतच या आंदोलकांना व्हॅनमध्ये डांबलं. त्यामुळे येथील वातावरण अधिकच चिघळले असून पोलिसांनी आंदोलन परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शरद पवारांना आज मी पुन्हा सांगू इच्छितो…’; संभाजीराजे संतापले

‘या’ आमदाराला ED चा मोठा दणका; तब्बल 255 कोटींची संपत्ती जप्त

“जीडीपी 10 % वाढेल, हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये”

सरनाईक यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता; पुरावे घेऊन किरीट सोमय्या थेट ED कार्यालयात

भाजप कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला; व्हीडिओ शेअर करत कैलास विजयवर्गीय यांनी मततादीदींना सुनावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या