प्रियंका गांधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, “वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी…”
नवी दिल्ली | काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहित एका आदिवासी व्यक्तीचं पार्शिव परदेशातून मायदेशी आणण्यासाठी विनंती केली आहे. या व्यक्तीचा रशियामध्ये मृत्यु झाला होता. प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे की, एका लहान मुलीला शेवटचं आपल्या वडिलांना पाहण्याची इच्छा आहे.
राजस्थान राज्यातील उद्यपुर जिल्ह्यातील गोदवा गावातील हितेंद्र गरासिया यांच्या मुलीसोबत एक फोटो प्रियंका गांधी यांनी ट्विट केला आहे. उद्यपुर येथील हितेंद्र गरासिया यांचे रशिया येथे निधन झाले आहे. त्यांचा परिवार गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचा मृतदेह मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे, असं प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हितेंद्र गरासिया यांची मुलगी ऊर्वशी गराशिया मला भेटली आणि तिने मला वस्तुस्थिती अवगत केली आहे. ऊर्वशी मोठ्या हिंमतीने आवाज उठवत आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, गरासिया परिवार पार्शिवाचे सन्मानासहित अंतिम संस्कार करण्याची मागणी करत आहे.
दरम्यान, दिवंगत हितेंद्र गरासिया यांच्या मुलीने खूप धैर्य दाखवले आणि यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडे दाद मागितली आहे. ती शेवटचं आपल्या वडिलांना पाहू इच्छित आहे, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. गरासिया यांची पत्नी आशा देवी, मुलगी ऊर्वशी यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. प्रियंका गांधी यांनी आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पाहा ट्विट-
उदयपुर के हितेंद्र गरासिया जी की रूस में मृत्यु हो गई थी। उनका परिवार 6 महीनों से उनका शव लाने के लिए संघर्ष कर रहा है।
उनकी बेटी उर्वशी गरासिया जी ने मुझसे मिलकर तथ्यों से अवगत कराया। उर्वशी बड़ी हिम्मत से आवाज उठा रही हैं।…1/2 pic.twitter.com/EoMxOpqWgf
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 28, 2022
थोडक्यात बातम्या-
“मोदी सरकारने देशद्रोह केला आहे”; राहुल गांधींचे केंद्रावर गंभीर आरोप
एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा शेवटचा इशारा, म्हणाले…
‘या’ नागरिकांना मिळणार स्वस्त दरात पेट्रोल, सरकारची मोठी घोषणा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…
मोबाईल वापरकर्त्यांसाठी खूशखबर! आता 28 नाही तर ‘एवढ्या’ दिवसांचा असणार रिचार्ज प्लॅन
Comments are closed.