Top News देश

‘एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले’; दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी संतापल्या

photo credite- Facebook/ priyanka gandhi

नवी दिल्ली | ग्रेटा थनबर्ग टूलकीट याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 21 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवीलाला अटक केली आहे. तिच्या अटकेनंतर काँग्रेस पक्षासह शेतकरी आंदोलकांनीही या घटनेचा निषेध करायला सुरुवात केली. या प्रकरणावरुन काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. प्रियंका गांधीं यांनी यासंदर्भात ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. रिलीझ दिशा रावी, दिशा रावी, इंडिया बिंग साईलेन्सड, असे हॅशटॅग देखील प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटमध्ये वापरले आहेत.

रविवार 14 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सायबर सेलने दिशा रवीला बंगळुरुमधून अटक केली. तिला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टापुढे हजर केलं. टूलकीटमधील केवळ दोनच ओळी एडिट केल्याचं तिनं कोर्टाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं दिशाला पाच दिवसांची कोठडी सुनावली.

दरम्यान, दिशा रवीच्या अटकेवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम आणि शशी थरुर यांनीही विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात त्या दोघांनीही आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केले आहेत.

थोडक्यात बातम्या-

पी. बी. सावंत कोण होते?, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्द

मराठी माध्यमातून शिक्षण, बीएमसीनं नोकरी नाकारली!; शिक्षक मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक

 युवराज सिंगला मोठा धक्का, या प्रकरणात अखेर FIR दाखल

 निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

 जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतात येताच सर्वात मोठी घोषणा

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या