लखनऊ | प्रियांका गांधींच्या कालच्या रोड शोसाठी जमा झालेल्या गर्दीचा चोरांनी चांगलाच फायदा घेतला. चोरांनी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांच्या महागड्या मोबाईल फोन आणि पाकिटांवर हात साफ केला, नवभारत टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
कन्नौज आणि बाराबंकी येथून जवळपास दोन डझन कार्यकर्ते प्रियांका आणि राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी लखनऊमधून आले होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांना जेव्हा या चोरीची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत धरणे आंदोलनास सुरुवात केली आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, काँग्रेस नेता शान अल्वी यांनी दावा केला आहे की, चोरांनी त्यांचा सव्वा लाखाचा मोबाइल चोरी केला. याशिवाय चोरांनी अनेक नेत्यांच्या खिशातील हजारो रुपये, वाहतूक परवाना आणि एटीएम कार्डसहित अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केली असल्याचं सांगितलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-युतीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर ठेवल्या ‘या’ चार अटी
–पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू
-संजय काकडे आणि अजित पवार यांच्या भेटीने चर्चांना उधान
–विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी?
-शिवसेनेचा 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव; अमित शहा-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा