बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीकरणाबाबत प्रकाश जावडेकरांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. अशात केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने येत्या 1 मार्चपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

येत्या 1 मार्चपासून देशातील 60 वर्षांवरील नागरिकांना आणि गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे, असं प्रकाश जावडेकरांनी सांगितलं आहे.

देशभरातील 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केलं जाईल, अशी माहिती प्रकाश जावडेकरांनी दिली आहे. ज्या व्यक्तींना सरकारी केंद्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोव्हिड लस घ्यायची असेल, त्यांना लसीचे पैसे मोजावे लागतील. तसेच लसीचे दर केंद्रीय आरोग्यमंत्री येत्या तीन चार दिवसात रूग्णालय प्रशासनाशी बोलून ठरवतील, असंही जावडेकरांनी

राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे कोरोना लसीकरण सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे 40 ते 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे, असेही राजेश टोपे म्हणाले होते. तर 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु आहे. जवळपास 652 केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून मृत्यूपूर्वी त्यांनी स्टेडियम आपल्या नावावर करून घेतलं”

काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…

…अन् त्याने लोखंडी रॉड डोक्यात मारून वडिलांच्या केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास”

“चंद्रकांत खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना निवडणुकीत उभं केलं होतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More