पुणे | पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर येथील टोलनाका हटवण्याच्या मागणीसाठी आज कृती समितीकडून आंदोलन करण्यात येत आहेत. कृती समितीकडून टोलनाका परिसरात धरणं आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर होणारी मोठी आर्थिक लूट आणि वाहन कोंडी यामुळे हा टोलनाका पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून हटवून तो सातारा जिल्ह्याच्या हद्दीत सुरु करण्यात यावा, अशी मागणी कृती समितीची आहे. त्यासाठी आज टोलनाका परिसरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान, खेड-शिवापूर टोलनाक्यावर भोर, वेल्हा, पुरंदर आणि इतर भागातून दररोद हजारो प्रवासी प्रवास करतात. नागरिकांना वाहतूक कोडींचा फटका बसत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मला राजकारणात यायचं नव्हतं पण…- पूनम महाजन
शेतकऱ्यांनी वीज बीलं भरु नये- रघुनाथ पाटील
महत्वाच्या बातम्या-
“परदेशी कन्येपासून झालेला राहुल गांधींचा जन्म देशासाठी मोठी चूक”
शरद पवारांची ‘ती’ मागणी वाढणार मुख्यमंत्री ठाकरेंची डोकेदुखी?
पवार साहेबांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे
Comments are closed.