Top News

मराठा समाज आक्रमक; आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरात आंदोलक रस्त्यावर

सोलापूर | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर आज मराठा समाजातर्फे सोलापुरात आंदोलन केलं जात आहे. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह अनेक भागात बंद पाळण्यात आला आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे 2 हजार पोलीस तैनात केले आहेत.

पंढरपुरातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. माळशिरस-पंढरपूर रस्त्यावर टायर जाळत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकार पबजीवरील बॅन हटवणार?; जिओ मोठा करार करण्याच्या तयारीत

“पुण्यातील कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार”

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

“जो शेतकरी जमिनीतून सोनं उगवतो, त्याच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय”

“कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या