बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोलापूरची तरुणी स्वत:च्या पॅाकेटमनीमधून करते असं काम की अभिमान वाटेल!

 सोलापूर | देशभरात कोरोनाचं संकट वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचं भयावह चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र या कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. अशात सोलापूरची एक तरुण मुलगी तिच्या पॅकेटमनीमधून जे काम करते ते ऐकून तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

संबंधित तरुणीचं नाव ज्योती यमाजी असं आहे. ज्योती ही शहरातील वियजनगर येथील रहिवासी आहे. ती आईच्या पोटात असतानाच ज्योतीचे वडिल वारले. त्यानंतर आई एका खाजगी पिठाच्या गिरणीत काम करुन घर खर्च आणि ज्योतीच्या शिक्षणाचा खर्च करते. अशातच ज्योती देखील हेल्थ फिटनेस क्लब येथे ट्रेनर म्हणून काम करते. यातून मिळणाऱ्या पैश्यापैकी काही पैसे ती गरीब लोकांना अन्न देण्यासाठी वापरते.

मागच्या लाॅकडाऊन पासून ज्योती रस्त्यावरील गरीब लोकांना चहा-बिस्कीट, फुड पॅकेट आणि पाणी बाॅटल वाटते. आपल्या गाडीवरुन निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला शोध घेत ती गरीबांना मदत करते. ज्योतीला या समाज सेवाची आवड तिच्या आईकडून निर्माण झाल्याचं ती सांगते. आता लाॅकडाऊन असल्यामुळे जिम बंद असून आता ज्योती घरुनच ऑनलाईन पी.टी चे क्लासेस घेतीये.

दरम्यान, ज्योती खेळात देखील अग्रेसर असून ती सध्या स्पर्धा परिक्षाची देखील तयारी करत आहे. खेळाची आवड जोपासून, शिक्षण घेत काम करुन मिळेल्या त्या पैश्यांमधून लोकांची सेवा करणं एवढं सगळं ज्योती अगदी व्यवस्थितपणे करतीये.

थोडक्यात बातम्या-

“देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हातात द्या”

“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’”

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

राजस्थानमधील अनोखा विवाह! बलात्काराच्या आरोपीने पीडितेशी पोलीस ठाण्यातच बांधली लगीनगाठ

‘माझी विकेट फक्त…’; या मराठी अभिनेत्रीच्या फोटोवर केलेल्या ‘खास’ कमेंटमुळे ऋतुराज गायकवाड चर्चेत

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More