बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत”

सातारा | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

पाच महिन्यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत extremely comfortable आहे. मागील दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही, असं सचिवांनी म्हटलं होतं. ऑक्टोबर 2020 मध्येच 1 लाख टन वैद्यकीय ऑक्सीजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असं देखील त्यांनी सांगितलं होतं. अशा या फाजील आत्मविश्वासामुळे आज देश गंभीर संकटात आहे, असं चव्हाण म्हणाले.

मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे आज देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये.

दरम्यान, भारत देशात 140 कोटी लोकसंख्या असून सध्या 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण अजुन पुर्ण झाले नसुन तरीदेखील 18 वर्षावरील सर्वांना लसीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तेवढी लस भारतात आहे का? याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अन्यथा 1 मे नंतर गर्दी झाली तर हे दुर्दैव म्हणावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं मोठं; 400 किमी अंतराहून येऊन मुस्लिम मित्राने दिली मुखाग्नी

आठ महिन्यांच्या गर्भवतीची हत्या, अत्यंत धक्कादायक घटनाक्रम आला समोर

#सकारात्मक_बातमी | सुरुवातीला बेड मिळेना, 2 दिवस वाहनातच, आज्जीची अखेर कोरोनावर मात

आईचा मृतदेह नेण्यासाठी मिळाली नाही ॲम्बुलन्स, स्मशानापर्यंतचा प्रवास सुन्न करणारा

18 वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीसाठी वाट पाहावी लागणार, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More