बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद… PSI साहेबांनी लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले 1 लाख रूपये!

पुणे | कोरोना महामारीत पोलिस आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहेत. आपल्या कुटुंबाचा विचार देखील न करता आपल्या कर्तव्याला ते जागत आहे. पण त्यांनी या काळात देखील आपलं सामादि भान जपत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. याचच उदाहरण म्हणजे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साने. त्यांनी आपल्या लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यतना निधीला 1 लाख रूपयांची मदत केली आहे.

एप्रिल-मे हा  खरं तर लग्नसराईचा काळ. अनेक जण भावी आयुष्याची स्वप्न याच काळात रंगवत असतात आणि बहुतेकांची स्वप्न देखील याच काळात पूर्ण होत असतात. परंतू यंदाच्या लग्नसराईवर कोरोनाचं संकट असल्याने अनेकांच्या इच्छेवर मुरड पडली. पण अनेकांनी कोरोना संकटाच्या संधीचं सोनं करत आपला क्षण अविस्मरणीय केला. अशातच सामाजिक बांधिलकी जपत करमाळा पोलिस स्थानकात कार्यरत असणारे प्रवीण साने यांनी 1 लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

हवेली तालुक्यातील टाळगाव चिखली इथल्या धर्माजी साने यांचे सुपुत्र असलेल्या पोलिस उपनिरीक्षक प्रवीण माने यांचा विवाह जुन्नर तालुक्यातील आर्वी येखील विलास गाढवे यांच्या लेकीशी पार पडली. या दोघा उच्चशिक्षीत उभयतांचा विवाह सोहळा थाटामाटात चिंचवड येथे पार पडणार होता. परंतू कोरोना आणि लॉकडाऊनमुळे  घराच्या दारासमोर त्यांनी विवाहबद्ध होणं पसंत केलं.

दरम्यान, प्रवीण साने कार्यरत असलेल्या करमाळा पोलिस स्थानकातील पोलिसांनी देखील साने यांच्या सामाजिक बांधिलकीचा अभिमान असल्याचं गर्वाने सांगितलं. तर येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला असंच सामाजिक भान बाळगून वागण्याची गरज आहे. तसंच जिथे जिथे आपल्याला संकटकाळी धावून जाणं शक्य असेल तिथे आपण आपलं काम चोखपणे पार पाडलं पाहिजे, असं अधिकारी साने यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

महत्वाच्या बातम्या-

कोरोना चाचणीचा दर सरकार ठरवणार, तोच रूग्णालयांना घ्यावा लागणार; ठाकरे सरकारचं महत्त्वाचं पाऊल

कोरोनाच्या गंभीर रूग्णांवर उपचारासाठी ठाकरे सरकारने उचललं सर्वांत मोठं पाऊल

ट्विटरवरून भाजप शब्द हटवण्याच्या चर्चांवर ज्योतिरादित्य शिंदेंनी मौन सोडलं, म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More