‘पबजी लव्ह स्टोरी’; पबजी खेळत असताना जडलं प्रेम, विवाहित महिला झाली बेपत्ता त्यानंतर….
नवी दिल्ली | फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर प्रेम आणि लग्नाच्या बातम्या सामान्य आहेत. पण चक्क पबजी खेळत असताना एकमेकांवर प्रेम झालं त्यानंतर गेम दरम्यान प्रेम कहाणीची आणि त्यानंतर घडलेली ही घटना खूप मनोरंजक आहे. खरं तर पबजी खेळत असताना एका विवाहित महिलेने एका तरूणावर मनापासून प्रेम केलं. आंधळ्या प्रेमात विवाहित महिलेने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी हिमाचल प्रदेशहुन वाराणसीला गेली.
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कांग्रा येथील एक विवाहित महिला अचानक बेपत्ता झाली त्यानंतर कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती सापडली नाही नंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तीचा शोध सुरू केला आणि पोलिसांनाही यश आलं मात्र त्यानंतर खरं प्रकरण उघड झालं.
ती म्हणाली की मला पबजी खेळायला खूप आवडतं. यावेळी पब्जी खेळत असताना तीची भेट वाराणसी येथील एका तरूणासोबत झाली. हा परिचय प्रेमाच्या रूपात बदलला दोघे तासन-तास एकमेकांशी बोलू लागले. हे प्रकरण आणखी वाढलं त्यानंतर विवाहित महिलेने आपल्या प्रेमापोटी कुटुंब सोडलं आणि त्याला भेटण्यासाठी वाराणसीला गेली.
दरम्याम, जेव्हा ती वाराणसीला पोहचली तेव्हा हा युवक अवघा 12 वीचा विद्यार्थी असल्याचं तिला माहिती पडलं. त्यानंतर विवाहित महिलेने स्वत: नातेवाईकांना फोन लावून तिला वाराणसीतून परत नेण्यासाठी मदत मागितली आणि अशा प्रकारे ही प्रेमकथा संपुष्टात आली.
थोडक्यात बातम्या-
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहिणीचा पतीसह अपघाती मृत्यू
“धनंजय मुंडेंनी काय देऊन प्रकरण सेट केलं हे त्यांनाच ठाऊक”
कोरोना गेला खड्ड्यात! संभाजी भिडेंनी आमदारालाच काढायला लावला मास्क!
शिवाजी पार्कवरून काका पुतण्या आमने-सामने; वाचा काय आहे प्रकरण
इंदापूर तालुक्यातील जवान लक्ष्मण डोईफोडेंना आसाममध्ये वीरमरण!
Comments are closed.