बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! या कारणामुळे पुणे विमानतळ ‘इतक्या’ दिवसांसाठी राहणार बंद

पुणे | पुण्यातील लोहगाव विमानतळ तब्बल 15 दिवस उड्डाणासाठी बंद असणार आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी 16 ऑक्टोंबर ते 30 ऑक्टोंबर पर्यंत विमानतळ बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्याय म्हणून मुंबई विमानतळाचा वापर करावा लागणार आहे.

महत्वाची माहिती म्हणजे की ज्या प्रवाशांनी आधीपासूनच आपली बुकिंग केलेली आहे, त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरूस्तीचे काम सप्टेंबर 2020 पासून हाती घेतलं आहे. 26 ऑक्टोंबरपासून या दुरूस्तीच्या कामाचा महत्वाचा टप्पा असणार आहे.

मागील काही दिवसांपासून लोहगाव विमानतळावरून रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवली होती. त्यामुळं मागील वर्षभरापासून लोहगाव विमानतळावर फक्त दिवसाच उड्डाणे होत होती.

दरम्यान, आता 16 ऑक्टोंबरपासून 30 ऑक्टोंबरपर्यंत सर्व प्रकारची विमाने उड्डाणासाठी आणि उतरण्यासाठी बंद असणार आहेत. याविषयीची अधिक माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

थोडक्यात बातम्या –

“भाजपसोबत ठरलेलं लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली”

“क्रूरपणाची परिसीमा पार करणाऱ्या भाजपचा माज जनतेनंच उतरवला पाहिजे”

अजित दादा, बच्चू कडूंना समज द्या- अमोल मिटकरी

माझ्यावर टीका झाली तरी चालेल, पण मी… – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

…म्हणून सपना चौधरीने आपल्या लेकाला दिलंय राजाचं नाव, पाहा व्हिडीओ!

‘देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का?’; लखीमपूर घटनेवरून संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More