बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय”

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे महानगरपालिकेवर सडकून टीका केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे देशातील अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत. त्याचीच पुनरावृत्ती पुणे भाजप करत असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बीडकर हे एकप्रकारे इस्टेट एजंट असल्याप्रमाणेच काम करत असल्याची टीका जगताप यांनी केलीय. कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मर्जीनेच हा कारभार सुरू असल्याची शक्यताही जगताप यांनी व्यक्त केली आहे.

पुणेकरांची फसवणूक करण्याचा भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशाराही जगताप यांनी दिलाय. तसेच 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्यासाठी म्हणून महानगरपालिकेच्या मालकीच्या 1 हजार 260 फ्लॅट विक्रीचा निर्णय घेण्यात आलाय. गरिबांना फ्लॅट देण्याच्या आडून सत्ताधारी भाजपचा हा सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा प्रयत्न आहे, असा आरोप जगतापांनी केला आहे.

दरम्यान, यापूर्वी येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केलाय.

थोडक्यात बातम्या- 

‘SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा’; MPSC चं मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी परिपत्रक

मुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात दोन तास बैठक; 11 पैकी ‘या’ 6 मागण्या ठाकरे सरकारला मान्य

सारथी संस्थेला निधीची कुठलिही कमतरता पडू देणार नाही- अजित पवार

राज्याला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका; आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

भाजपला लागणार मोठी गळती, अनेक बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More