बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी खलबतं… अखेर पुणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

पुणे | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचा शहराध्यक्ष बदलणार, अशी चर्चा रंगली होती. या विषयावर मोठी खलबतं देखील झालेली पहायला मिळाली मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या निवडीनंतर पुणे काँग्रेसचे शहराध्यक्षपद रमेश बागवे यांच्याकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय शहराध्यक्ष बदलीच्या चर्चांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.

पुण्यात काँग्रेसला पुन्हा संजिवनी देण्यासाठी नव्या दमाच्या शहराध्यक्षाची गरज बोलून दाखवली जात होती. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यातही या विषयाची खमंग चर्चा झालेली पहायला मिळाली. मात्र अखेर शहराध्यक्षपदी रमेश बागवे यांनाच ठेवण्यात आलं आहे. आगामी पुणे महापालिका निवडणूक त्यांच्याच नेतृत्त्वात लढवली जाईल हे आता स्पष्ट झालं आहे.

उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडला अध्यक्ष मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र पिंपरीत पक्षाला मात्र चेहरा मिळू शकला नाही. त्यामुळे पिंपरीच्या शहराध्यक्षपदाचा निर्णय कधी होणार? हा एक प्रश्नच आहे.

दुसरीकडे रात्री उशिरा नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीत 18 उपाध्यक्ष, 1 खजिनदार, 65 सरचिटणीस, 104 चिटणीस आणि 6 प्रवक्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

धोका वाढतोय! मुंबईत आजही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाजा आजची आकडेवारी

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाचा आजची आकडेवारी

‘भारताने पाकिस्तानसोबत….’; तालिबान्यांचा काश्मीरबाबत भारताला ‘हा’ सल्ला

काबूल विमानतळावरील पाणी बॉटल आणि जेवणाची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“नारायण राणे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More