बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

पुणे | भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्यात देखील धुमाकूळ घातला होता. पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र, याच पुण्यात आता कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 196 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 289 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 10 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 04 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 235 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,84,080 इतकी आहे. तर पुण्यात 2855 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8,696 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,72,529 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 6277 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही रूग्णसंख्या घटली.

थोडक्यात बातम्या- 

‘राईचा पर्वत करण्याची गरज नाही’; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण

“झोपडपट्टीमध्ये जाणारे बळी हे शिवसेनेचं पाप; महापालिका निवडणुकीत यांना कठोर शिक्षा द्या”

“महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तिला विठ्ठल माफ करणार नाही”

इंजेक्शन पाहून लहान मुलासारखी रडायला लागली महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

चुकीला माफी नाही!, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More