बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…

पुणे |   गेल्या आठवड्यापासून पुण्यात दररोज 100 ते 110 च्या आसपास रूग्ण वाढत आहेत. आज पुण्यात 102 रूग्णांची वाढ झाली. तर 49 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज शहरात 5 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर 148 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 50 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात आता एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3598 वर पोहचली आहे. यामध्ये डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 3229 आणि ससून रूग्णालयात 369 रूग्ण उपचार घेत आहेत.

पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1599 एवढी आहे. तर आतापर्यंत 199 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. दुसरीकडे आजपर्यंत एकूण 1800 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आज 1419 लोकांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी 102 लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी परतवून लावायचंय… शासनाला सहकार्य करा- उद्धव ठाकरे

“40 हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगांसाठी राखीव, माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार”

लॉकडाऊन नसतं तर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही – उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More