बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 115 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 169 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 2 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5,02,666 इतकी आहे. तर पुण्यात 1,291 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आत्तापर्यंत एकूण 9,056 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज 5,390 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

…अन् माहीने पुन्हा एकदा जिंकलं मन; धोनीच्या ‘त्या’ निर्णयाचं सर्वत्र कौतूक

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ! पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

“रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तर असे भ्रम होतात म्हणे!”

“शाहरुख खानच्या मुलाला सोडून द्या, मी पण गांजा घेतला होता”

“भैय्या दवाखान्यात जाऊनसनी काय करू?, मेलो तरी चालेल पण मागं हटायचं नाय”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More