बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 96 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5,04,016 इतकी आहे. तर पुण्यात 832 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 9,073 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज 5,490 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

“सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात पण त्यांना मेंदू नाही”

‘देशाला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळालंय’; भाजप प्रवक्त्याचा जावईशोध

शासनाचा सावळा गोंधळ! दिवाळी सुट्ट्यांची तारीख अचानक बदलली

“एकनाथ खडसे स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या पातळीचे समजायचे मग पराभव का झाला?”

मोठी बातमी! नीरज चोप्रासह अन्य 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More