बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आता वस्ती तिथे लसीकरण; महापालिकेचा मोठा निर्णय

पुणे | पुणे महानगरपालिकेने लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच पुणे महानगरपालिकेने आता लसीकरणासाठी एक मोठा आणि स्तुत्य निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. अनेक नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करून घेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेने आता वस्ती तिथे लसीकरण ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पुणे शहरातील अशिक्षित व तंत्रज्ञानाची माहिती नसणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व ते नागरिक त्याच पार्श्वभूमीवर आता झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वस्तीवर जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.

वस्ती तिथे लसीकरण ही योजना पुणे महानगरपालिकेतर्फे लवकरच राबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या लस घेता येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रात 500च्या आसपास झोपडपट्ट्या असून 8 लाख नागरिक या झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचं लसीकरण वस्तीवर जाऊन महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे जेणेकरून ऑनलाइन अडचणींचा सामना न करता सुरळीतपणे या नागरिकांना लसीकरण पूर्ण करता येईल.

 

थोडक्यात बातम्या –

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More