पुणे | कोरोना विषाणुमूळे संकटात सापडलेल्या गरजू नागरिकांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट आणि सुवर्णयोग तरूण मंडळाने मदतीचा हात दिला आहे. तसंच संकटात सापडलेल्या विविध संस्था आणि हॉस्पिटल्सला देखील ट्रस्टने मदत केली आहे. (Pune Dagdusheth Ganpati trust Help Needy People)
ससून रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अशा चार हजार लोकांची दोन्ही वेळची विनामूल्य भोजनसेवा तसंच अनाथ मुलांची संस्था असलेल्या श्रीवत्सला धान्याची मदत दगडूशेठ ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे. (Pune Dagdusheth Ganpati trust Help Needy People)
कासेवाडी वसाहतीतील एक हजार कुटुंबांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पाच हजार साबणांचे वाटप आणि सहा रुग्णवाहिकांच्या माध्यमातून विनामूल्य सेवा दिली जात आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. (Pune Dagdusheth Ganpati trust Help Needy People)
दरम्यान, पुण्यात काल रात्रीपर्यंत 60 कोरोनाबाधित रूग्णांची संख्या होती. तर पुणे ग्रामीणमध्ये 7 संख्या आहे. दुसरीकडे कोरोनामुळे पुण्यात आज तिसरा मृत्यू झाला आहे. येरवडा भागातील लक्ष्मीनगर येथील एका महिलेला श्वसनाचा त्रास झाल्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचे निदान झालेल्यांपैकी हा तिसरा मृत्यू आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात
दिल्लीमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे- अरविंद केजरीवाल
महत्वाच्या बातम्या-
अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितली मदत
कोरोनामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय
पाकिस्तानमध्ये कोरोनाचा हैदोस; कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली इतक्या हजारांवर
Comments are closed.