पुणे । पुण्यातील डेक्कन परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या गर्दीची कोंडी सुटण्याची शक्यता आहे. कारण लवकरच डेक्कन येथे एक दुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे.
डेक्कन जिमखाना येथील मॅक्डोनाल्ड शेजारच्या पार्किंगच्या रिकाम्या जागेत हे दुमजली वाहनतळ उभारलं जाणार आहे.
तळमजला अधिक दोन मजले अशा पद्धतीचं वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील त्याचा सुधारित प्रस्ताव हा प्रकल्प विभागाने बांधकाम विभागासमोर सादर केलाय.
या वाहनतळापासून 50 मीटर अंतरावर मेट्रोचं स्थानक होणार आहे. त्यासाठी हे वाहनतळ महत्त्वाचं मानलं जातंय.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाला पळवून लावण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी खा; नवा निष्कर्ष आला समोर!
बाटलीबंद पाण्याची चव आता बदलणार; जाणून घ्या काय आहे कारण!
दिल्लीतील शेतकरी आंदोलकांचा मोदी सरकारला अल्टिमेटम; घेतला हा मोठा निर्णय!
राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश, मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची मोठी माहिती
गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध; भारतासह 27 देशांचं समर्थन, पाकिस्तानचा मात्र विरोध!