पुण्याच्या पोरीची हुशारी, फेसबुकवरुन मैत्री करुन पकडला चोर!

पुणे | टेस्ट राईडच्या नावाखाली चोरट्यानं स्कूटर लांबवली, मात्र पीडित परवेझ मणियार यांच्या मुलीनं या चोरट्याला चांगलीच अद्दल घडवली. 

परवेझ यांनी एका ऑनलाईन साईटवर जाहिरात टाकल्यानंतर हा प्रकार घडला होता. मात्र या प्रकारानंतर खचून न जाता त्यांच्या मुलीनं या चोराचं नाव शोधून त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्याच्याशी मैत्री केली. 

फेसबुकवर चॅटिंग करताना आपल्याला स्कूटर हवी असल्याचं तिनं त्याला सांगितलं. त्याने आपल्याला स्कूटर विकायची असल्याचं सांगितलं. संभाजी उद्यानात भेटायचं ठरलं, त्यानंतर दोन्ही बापलेकींनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अजय यादव उर्फ राहुल प्रजापती असं या आरोपीचं नाव आहे.