बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली कोरोनाची लस; नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

पुणे |  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज दुपारी कोथरूडच्या महापालिका रूग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली आहे. कोरोना लस घेतल्याबद्दल आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून ही माहीती दिली आहे. तसेच लस पुर्णपणे सुरक्षित असल्याचंही ते यावेळी म्हटले आहेत.

‘कोरोना लसीकरण मोहिमेचा चौथा टप्पा आजपासून संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आला. याच चौथ्या टप्प्याअंतर्गत आज मी कोथरूड येथील आपल्या पुणे महानगरपालिकेच्या सुतार दवाखान्यात लसीचा पहिला डोस घेतला.’ अशा आशयाचं ट्विट करून त्यांनी पुण्यात तयार झालेली ‘कोव्हिशिल्ड’ ही कोरोनाची लस घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.

कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. सर्वांना लस कधी येईल? हा प्रश्न सतावत असताना लसही आली. पण लस आल्यानंतर देखील ही लस घ्यावी की नाही असा प्रश्न लोकांना पडला. लसीच्या चाचण्या पुर्ण होऊनही लस प्रभावकारी आहे की नाही? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत असतानात लस सुरक्षित असल्याचं आणि जनतेने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमेत सामिल होण्याचं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जनतेला केलं आहे.

राजकीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणात लस घेण्यास सुरुवात केली असताना मल्लिकार्जुन खरगे यांनी मागच्या महिन्यात माझे वय 70 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे कोरोनाची लस तरुणांना आधी दिली पाहिजे आणि त्यांचं आयुष्य वाढवलं पाहिजे. माझ्याकडे आता 10-15 वर्ष जीवन आहे असं मत व्यक्त केलं होतं.

थोडक्यात बातम्या

पोलिसाची शेतकऱ्याला शेतात जाऊन बेदम मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ

कोरोना लसीसंदर्भात गुडन्यूज, सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, ‘या’ वयोगटात कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ

महाविकास आघाडी सरकारचा छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठा दणका

धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग; आरोग्य यंत्रणेची कबुली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More