Top News पुणे महाराष्ट्र

फक्त दहा रुपये भरा, पीएमपीचा प्रवास दिवसभर करा!

पुणे | सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी महापालिकेने मध्यवर्ती भागामध्ये अवघ्या दहा रुपयांमध्ये पीएमपीचा दिवसभर प्रवास करता येण्याची योजना आणली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी महापालिकेने पुढाकार घेतल्याचं दिसत आहे.

मध्यवर्ती भागातील काही मार्ग यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गावर प्रवाशांना अवघ्या दहा रुपयांत दिवसभर प्रवास करता येणार आहे. महापालिकेच्या या स्तुत्य निर्णयामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

डेक्कन ते पुलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गासह स्वारगेट- टिळक रोड- खजिना विहीर- आप्पा बळवंत चौक- पुणे स्टेशन मार्गे पुलगेट हा वर्तुळाकार मार्ग नियोजित आहे. या चार मार्गावर तिकिट शुल्क दहा रुपये असेल.

मध्य पुण्यातील रस्त्यांची रुंदी अतिशय कमी आहे. त्यामुळे याठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी होणाऱ्या या भागात पीएमपीच्या मध्यम आकाराच्या गाड्या भाडेतत्त्वावर आणण्यात येणार आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

मी मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण होणार- इंदोरीकर महाराज

“आम आदमी पक्षाला अमित शहांनी विकत घेतलंय का?”

महत्वाच्या बातम्या-

स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाच्या ‘संघ’ परिवाराचे योगदान काय?- शिवसेना

“वारिस पठाणांच्या वक्तव्यामुळे दिल्ली पेटली”

अनिल काकोडकरांपेक्षा वर्षा गायकवाड बुध्दीमान आहेत का?; विनोद तावडेंची टीका

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या