पुणे | सध्या लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी मजूर, कामगार, विद्यार्थी, पर्यटक अडकले आहेत. मुंबई-पुण्यात ही संख्या लक्षणीय आहे. पुणे शहरातून आम्हाला बाहेर जायचंय अशा आशयाचे अनेक अर्ज पुणे पोलिसांकडे आल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिली आहे.
व्यवसाय, नोकरी तसंच शिक्षणानिमित्त पुण्यात वास्तव करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे हे नागरिक पुण्यात अडकून पडले आहेत. मात्र शासनाच्या परवानगीने हे नागरिक आता आपल्या गावाकडे प्रवास करण्यास अधीर झाले आहेत.
पुणे पोलिसांनी आतापर्यंत 1219 विद्यार्थांना घरी जाण्यास परावनगी दिली आहे तसंच घरी देखील पोहचले आहेत. तर आणखी 2 हजार विद्यार्थ्यांनी घरी जाण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत त्यावर कार्यवाही करणं सुरू असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
दरम्यान, परराज्यातील मजुरांना आपापल्या राज्यांत जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. सध्या पोलिस स्थानकात त्यांची नोंदणी केली जात आहे. दोन दिवसांत 28 हजार लोकांनी नोदणी केली आहे, अशी माहितीही पोलिस आयुक्तांनी यावेळी दिली.
ट्रेंडिंग बातम्या-
पाहा पुण्यात किती रूग्ण सापडले? तर किती रूग्णांना ठणठणीत होऊन घरी सोडलं…
राज्यातील सर्व दुकाने उघडण्यास मुभा; राज्य सरकारचा मोठा निर्णय
महत्वाच्या बातम्या-
मुंबईतील सर्व सवलती रद्द; मुंबईकरांच्या बेशिस्तपणामुळे आयुक्तांचा निर्णय
….तरच दारूविक्री सुरू ठेवावी- पृथ्वीराज चव्हाण
आमचा चौथा उमेदवार आरामात निवडून येईल; फडणवीसांनी महाविकास आघाडीला ललकारलं
Comments are closed.