पुणे | पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ८५ पोलिसांना तडक पोलीस मुख्यालयात बोलवून घेतलं आहे. ५ दिवस हे पोलीस मुख्यालयातच राहणार आहेत.
आपापल्या भागात वसुली अधिकारी म्हणून काम पाहणारे हे कर्मचारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाटलांनी त्यांना तातडीने बोलवून घेतल्याचं कळतंय.
या पोलिसांना का बोलवून घेतलं हे जाहीर करणं योग्य होणार नाही. मात्र पुढील पाच दिवस यांना योग्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे, असं संदीप पाटील यांनी सांगितलं.
प्रशिक्षणानंतर या पोलिसांना त्यांच्या मूळ ठाण्याच्या हद्दीत नियुक्त केलं जाईल, त्यानंतर त्यांच्या वागणुकीत बदल न झाल्यास वेगळा विचार केला जाईल, अशी माहिती आहे.
दरम्यान, या पोलिसांमध्ये शिक्रापूर आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सर्वाधिक प्रत्येकी ५ पोलिसांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
-सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ
-राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस आक्रमक; एम्प्लॉयमेंट ऑफिसला ठोकणार टाळे
-मोदी सरकारचा दणका; 15 भ्रष्ट उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना घरी पाठवलं
-पराभवाने पाकिस्तानी चाहत्याला रडू कोसळलं; रणवीर सिंगने पुसले अश्रू
-काही बरे-वाईट झाले तर त्याला शिवेंद्रराजेच जबाबदार राहतील!
Comments are closed.