बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तासात धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता

पुणे  | महाराष्ट्रातील काही भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काही ठिकाणी तर मागील काही दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. यंदाचा पाऊस मागील वर्षापेक्षा जास्त पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

अशातच पुणे जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या दिशेने संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात धोधो पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला असल्याचीही नोंद झाली आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा येथे 149.1 मिलीमीटर इतका पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. यामध्ये सातारा, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे.  मुंबई, ठाणे, पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांना एलो अलर्ट देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचं पूर्ण सामर्थ्य सत्ताधारी शिवसेनेत आहे”

पेट्रोल-डिझेलवरील करातून केंद्र सरकार मालामाल, तब्बल ‘इतकी’ कमाई

पहिल्यांदा गोळीबार… नेम चुकवून धावत सुटला तर पाठलाग करुन सपासप वार

जगाचं टेंशन वाढलं!; कोरोना गेला नाही तेच नोरो व्हायरसचा धुमाकूळ

“लोकांच्या जीवापेक्षा सण महत्त्वाचे नाहीत”, कत्तलीसंदर्भात कोर्टानं फटकारलं!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More