मुलाकडूनच आई-वडिलांची हत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे | 30 वर्षीय तरूणानं आई-वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. पुण्यातील शनिवार पेठ भागात ही घटना घडलीय. पराग क्षीरसागर असं आरोपीचं नाव असून त्याला ताब्यातही घेतलंय.

परागनं वडिलांना गळा चिरून तर आईचा गळा दाबून हत्या केल्याचं उघडकीस आलंय. तो मानसिक रूग्ण असून त्याच्यावर उपचारही सुरू होते. आई वडिलांना मारल्यावर त्यानं हाताची नस कापून आत्महत्येचाही प्रयत्न केला, मात्र तो वाचला.

दरम्यान, परागला जुळा भाऊ असून तो यावेळी घरातच असल्याची माहिती समोर आलीय.