बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! तरुणीचा पाठलाग करुन भररसत्यात फाडले तिचे कपडे अन्…

पुणे | काही दिवसांपुर्वी पुण्यातील आयटी कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलेला एका टॅक्सी चालकाने गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखीन एक संतापजनक घटना समोर आली आहे. आयटी कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या एका तरुणीचे आरोपी व्यक्तीने भररसत्यात कपडे फाडले.

27 वर्षीय पीडित तरुणी एका नामांकित आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत असून ती गुरूवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास रात्रपाळी संपवून घरी चालली होती. यावेळी दुचाकीवरून एकटी घरी जात असल्याचं पाहून एका अज्ञात युवकाने तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. यावेळी संबंधित आरोपी युवकानं अंगात शर्टही घातला नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने तिची दुचाकी वेगाने पळवायला सुरुवात केली. तेव्हा आरोपीनंही तिचा पाठलाग सुरू ठेवला

पीडित तरुणीची दुचाकी घराजवळील एका सोसायटीत असलेल्या स्पीड ब्रेकरवरून आदळली. त्यामुळे ती खाली पडली. यावेळी पाठलाग करणाऱ्या युवकानं पीडितेजवळ येऊन तिचे कपडे फाडले आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना अचानक घडल्यानं घाबरलेल्या तरुणीनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा सोसायटीचा सुरक्षा रक्षक तिच्या मदतीला धावून आला. त्यानंतर आरोपी युवक घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, संबंधित घटनेच्यावेळीस आरोपीने शर्ट घातलेला नव्हता आणि मास्कने तोंड पुर्णपणे झाकलं होतं. 27 वर्षीय पीडित तरुणीनं कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली आहे. तसेच याबाबतचा कोणत्याही पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील- संजय राऊत

लता मंगेशकरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली ‘इतक्या’ लाखांची मदत

‘भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जॉन अब्राहम आला धावून; उचललं हे मोठं पाऊल!

चंद्रपूर हळहळला! अवघ्या 35 वर्षीय डाॅक्टराचा कोरोनामुळे मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More