पुणे महाराष्ट्र

पुण्यालगत असणाऱ्या ‘या’ 4 गावातील सीलबंदचा आदेश अखेर रद्द

पुणे |  पुणे परिसरातील अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. मात्र अशा स्थितीतही पुण्यालगत असणाऱ्या चार गावांना पोलीस प्रशासनाकडून सील करण्यात आलं होतं. मात्र पुण्यालगतच्या त्या 4 गावातील सीलबंदचा आदेश रद्द करण्यात आला आहे.

हवेलीच्या प्रांताधिकाऱ्यांनीच हा आदेश रद्द केला आहे. पुण्यालगत असणाऱ्या नऱ्हे, मांजरी, वाघोली, कदमवाकवस्ती ही चार गावं 6 दिवसांसाठी सील केली होती. पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना अनेक निर्देश दिले आहेत.

पुण्यातील दुकानं उघडण्यास पोलीस हरकत घेत असल्याची तक्रार व्यापारी महासंघाने पालकमंत्र्यांकडे मांडताच अजित पवार यांनी दुकानं उघडण्यास काय अडचण आहे? असा सवाल उपस्थित करून पोलिसांना दणका दिला आहे.

पालिका आयुक्तांनी 90 टक्के पुणे खुलं केलं असलं तरी काही भागात पोलीस दुकानं उघडू देत नसल्याची व्यापाऱ्यांची तक्रार होती. त्यावर अजित पवारांनी प्रशासनाला हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

ट्रेडिंग बातम्या-

दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का?; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

…तर परवडणाऱ्या दरात आणि अखंडित वीजपुरवठा होईल- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

भवानी पेठेने कोरोनाला हरवलं… पुण्यात रूग्णसंख्येत दहाव्या क्रमांकावर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या