बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

पुण्यात आज दिवसभरात 1317 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2985 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 73 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 26 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1415 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,59,303 इतकी आहे. तर पुण्यात 20589 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7706 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 431008 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 11553 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

पुण्यात वाढत्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा शासन आणि प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलत आहे.

थोडक्यात बातम्या-  

मन सुन्न करणारी घटना; बापाने मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चालत स्मशानात नेला, पाहा व्हिडीओ

गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला- पंकजा मुंडे

हृदयद्रावक घटना! 25 दिवसांपूर्वी आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू

“महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला”

“कोरोनाची लढाई कठीण आणि भयानक होणार आहे, सज्ज रहा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More