बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाॅकडाऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहर रक्ताच्या थारोळ्यात

पुणे | पुण्यात गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसाढवळ्या होणारे खून आता मध्यरात्री देखील होऊ लागले. कालच एका पोलीस हवलदाराची आणि बुधवार पेठेतील देह विकणाऱ्या बाईच्या हत्येची बातमी ताजी असतानाच आता आणखी एक खूनाचा थरार समोर आला आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित घटना ही पुण्यातील रायकर मळा येथील जाधवनगर भागातील आहे. काही मित्रांनी मिळून येथे दारुची पार्टी करण्याचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे सर्व दारु प्यायला बसले असताना अचानक आरोपी तिथं आले. त्यांच्या हातात तलवार आणि कोयते होते. यादरम्यान आरोपी शिवीगाळ करु लागले. तसेच, तुम्हाला मस्ती आली आहे का, आज तुम्हाला संपवतो, तुम्ही खुनशीने पाहता का, असं म्हणत वार करण्यास चालू केला.

तलवार आणि कोयत्याने सपासप वार केल्यामुळे या प्रकरणात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर जखमी तरुणाने पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, संबंधित आरोपीने मागील भांडणांमुळे वार केलं असल्याचं समोर आलं आहे. तसेच संबंधित मृत झालेल्या तरुणाचं नाव शाम सोनटक्के असं आहे. शाम हा अवघ्या 24 वर्षांचा होता. तर जखमी झालेल्या तरुणाचे नाव योगेश असं असून तो देखील केवळ 19 वर्षांचा आहे. हा प्रकार रात्री घडला असून या घटनेनंतर संपुर्ण परिसरात चांगलाच गोंधळ उडाला आहे.

थोडक्यात बातम्या-

आसाराम बापू आयसीयूमध्ये दाखल; काही दिवसांपुर्वी झाला होता कोरोना

‘मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही’; सामनातून विरोधकांवर टीकेचे बाण

आसामच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार?; भाजपमध्ये संभ्रम

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ 7 शहरात’ महिंद्रांनी सुरू केली ‘ऑक्सिजन ऑन व्हिल’ सेवा

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ; निवडणूक संपताच दरवाढीला सुरुवात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More