बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे हादरलं! निवृत्त पोलीस अन् गुन्हेगारात वाद झाल्यानंतर गुन्हेगाराचा विचित्र मृत्यू

पुणे | पुण्यात एका गुन्हेगाराचा आणि निवृत्त पोलिसामध्ये वाद झाल्यानंतर घडलेल्या विचित्र घटनेत गुन्हेगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मनीष काळूराम भोसले असं मृत्यू झालेल्याचं नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीष हा बोपडी येथील रहिवासी असून त्याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत. मनीषला दारुचं व्यसन होतं. अशातच रेल्वे दलातून निवृत्त झालेले 62 वर्षांचे कर्मचारी आनंदनगर येथे डब्बा आणण्यासाठी गेले होते. यादरम्यान मनीष देखील तेथे उपस्थित होता.

संबंधित ठिकाणी मनीषने कर्मचाऱ्यासोबत विनाकारण भांडणं काढलं. त्यानंतर त्यांच्यात वाद पेटला. यामध्ये कर्मचाऱ्याने मनीषला एक चापट मारली आणि निघाले. त्यानंतर मनीष त्यांच्या मागे जाऊ लागला. यादरम्यान मनीष अचानक खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, संबंधित घटनेदरम्यान देखील मनीष दारुच्या नशेत होता. तसेच संबंधित ठिकाणी सीसीटिव्ही असल्यामुळे हा प्रकार त्यामध्ये कैद झाला असून मनीषचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी धडकी भरवणारी

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात कोरोना होतो?; समोर आली ही धक्कादायक माहिती

‘…तर पुण्यातील अत्यावश्यक दुकानंही बंद करा’; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीनं एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”

“लोकांनी ऐकलं आहे, आता विरोधी पक्षानेही 1 मेपर्यंत घरीच बसावं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More