पुणे | राज्यात 31 जानेवारी अखेरपर्यंत लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाची परवानगी न घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या 11 जानेवारी रोजी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणी उच्च शिक्षण विभागाने पुणे विद्यापीठाला खुलासा सादर करण्याचे निर्देश दिलेत. पुणे विद्यापीठाने राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून परवानगी न घेता पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याने, त्यांचाच निर्णय आता अंगलट आला असल्याचं दिसत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने स्थानिक परिस्थिती आणि राज्य शासन नियमाच्या अधिन राहून महाविद्यालय सुरू करण्यास मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. परंतु, राज्य शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत पुणे विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, पुणे विद्यापीठाने 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतल्यामुळं शिक्षण क्षेत्रात संभ्रम वाढला आहे. त्याचबरोबर विद्यार्थीही गोंधळात पडले आहेत.
थोडक्यात बातम्या-
बहुचर्चित टाटा अल्ट्रोजमध्ये मोठा बदल; ‘या’ तारखेला उठणार पडदा!
10 चिमुकल्यांच्या मृत्यूबद्दल राहुल गांधींकडून दु:ख व्यक्त; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
10 चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत मुख्यंत्र्यांकडून दुःख व्यक्त; दिले चौकशीचे आदेश
भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणार- अजित पवार
…नाहीतर 8 फेब्रुवारीपासून तुमचं व्हॉट्सअप अकाऊंट आपोआप बंद होणार!