बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, तब्बल एवढ्या गावात झालं 100% लसीकरण

पुणे | गेल्या तब्बल दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच हळूहळू ही रुग्णसंख्या आटोक्यात आली असताना आता कोरोनाच्या नव्या विषाणूने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. परंतु असे असतानाही पुण्यातुन एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील तब्बल 443 गावांमध्ये 100% लसीकरण पूर्ण करण्यात आल्याने या गावांचा सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे 443 गावातील सर्व नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण करणाऱ्या तालुक्यात मुळशी तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्या लगोलग वेल्हे आणि भोर व इंदापूरचा क्रमांक लागतो. संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून पुण्यातील ही आकडेवारी दिलासा देणारी आहेत. यामुळे पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे.

डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधून आलेल्या एका तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची त्याला लागण झाली आहे की नाही याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही. तसेच नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना पुणे जिल्ह्यातून लसीकरणाबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या

परमबीर सिंह हाजीर हो! सिंह अखेर चांदीवाल समिती समोर लावणार हजेरी

‘या’ ॲपद्वारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत करता येणार शेती मालाची विक्री

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

विराटच्या रोमँटीक पोस्टवर अनुष्काचं मजेशीर उत्तर, म्हणाली…

ओमिक्राॅनची धास्ती! आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंधाबाबत निर्णय होणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More