पुणे | पुणे तिथे काय उणे असं म्हणणाऱ्या पुण्यात महिलांचा हुंड्यासाठी मोठ्या प्रमाणात छळ करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात गेल्या वर्षी हुंड्यासाठी महिलेचा खून, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण, छळाच्या तब्बल 257 घटना घडल्या आहेत. सास्कृंतिक शहर असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस महिलांच्या छळवणूकीच्या तक्रारीत वाढ होत चालली आहे.
हुड्यांसाठी आणि मानपानासाठी विवाहित महिलांचा छळ केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. लग्नात मानपान केला नाही, घर, गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, स्वंयपाक चांगला बनवता येत नाही, वंशाला दिवा होत नाही, संसार करता येत नाही अशा कारणांसाठी महिलांचा छळ केला जात असल्याचं समोर आलं आहे.
2019 ते 2020च्या दरम्यान दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये 2019 मध्ये 349 तर 2020 मध्ये 257 एवढ्या घटना घडल्या आहेत. 2019 मध्ये हुंड्यासाठी 11 खून करण्यात आले आहेत. यादरम्यान 311 महिलाचा नातेवाईकांकडून छळ करण्यात आला आहे. या कारणांमुळे 14 महिलेंनी आत्महत्या केल्या आहेत.
2020 मध्ये पुणे शहरात हुंड्यासाठी पत्नीचा खून केल्याच्या 9 घटना घडल्या आहेत. त्याशिवाय दोन खूनाचे प्रयत्नही करण्यात आले आहेत. तर काही घटनांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी खोट्या असल्याचं उघडकीस आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात ‘इतक्या ‘लोकांचा सहभाग, एटीएसला मिळाली मोठी माहिती
“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, उलट केंद्र सरकारच बरखास्त करा”
माही रिटन्स! मैदानावर येताच धोनीनं टोलवला 114 मीटरचा सिक्स; पाहा व्हिडीओ
धक्कादायक! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं केली तक्रार दाखल
महिलेचा मोदींसोबत फोटो छापून आला, वास्तव समोर आल्यावर उडाली खळबळ
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.