पुणे महाराष्ट्र

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू

पुणे | माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांची हत्या झाल्याची घटना शिवणे येथे  घडली आहे. विनायक शिरसाट यांचा मृतदेह दरीत संशयास्पदरित्या आढळून आला आहे. त्यांच्या मृत्यूने शिवणे येथे एकच खळबळ उडाली आहे.

विनायक शिरसाट हे शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते होते. त्यांची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. शिरसाट हे गेल्या आठ दिवसांपासून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता होते.

विनायक शिरसाट यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात केली होती. 

दरम्यान, मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान असलेल्या दरीत विनायक शिरसाट यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मोबाइल आणि कपड्यांवरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. 

महत्वाच्या बातम्या-

-संजय काकडे आणि अजित पवार यांच्या भेटीने चर्चांना उधान

विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी?

-शिवसेनेचा 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव; अमित शहा-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

‘भारतरत्न’ स्वीकारण्यास भूपेन हजारिका कुटुंबीयांचा नकार

संभाजी भिडेंवरील गुन्हे मागं घेतले जातात? ते सरकारचे जावई आहेत का?- नितेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या