Top News कराड महाराष्ट्र

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र लबाड”

कराड | सध्या कोरोनामुळे राज्यातीलच नाहीतर जगभरातील उद्योगधंद्यांना मोठा फटक बसला आहे. कोरोनाची लाटओसरल्यावर पुन्हा सर्व काही रूळावर येत होतं. मात्र पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढल्याने दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे. यामध्ये आधीच बळीराजालाही मोठा फटका बसला होता. मात्र तो अजुन यातून सावरला नाही तर राज्य सरकारने मागील युनिटच्याआधारे अंदाजे वीजबिल पाठवलंं. त्यामुळे शेतकऱ्यांवर या वीज बिलाचा एक बोजा पडला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

कोरोनामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने वीजबिलाच्या वसुलीतून लुटण्याचं काम करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र लबाड असल्याचं म्हणत पंजाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाणा सोडले आहेत.

कोरोनाकाळात शेतकऱ्याला फार मोठं नुकसान झालं आहे आणि राज्य सरकार वीजबिलाच्या माध्यामातून सरकारची लुट सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सध्या कोणीही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल भरू नये, असं आम्ही जाहीर करत असल्याचं पंजाबराव पाटील म्हणाले. त्यासोबतच मुख्यमंत्री लबाड आहेत त्यांनी गेल्या वर्षी नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रूपये देण्याची घोषणा केली होती मात्र एक कवडीही मिळाली नसल्याचं पंजाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाकाळात शेतकऱ्यांनी बागायतीमध्ये केलेलं उत्पादन त्यांना लॉकडाऊनमुळे बाजारात पाठवता आलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा तोटा झाला होता. त्यात आता अव्वाच्या सव्वा आलेल्या लाईटबिलमुळे त्यांच्या कर्जामध्ये आणखी भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ‘तो’ व्हिडीओ झाला लीक, संजय राठोडांचा संबंध असल्याचा दावा!

राज्य सरकारमधील ‘या’ नेत्यांवर कारवाई का होत नाही?- भाजप

…तोपर्यंत पतंजलीच्या ‘कोरोनिल’ विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही- अनिल देशमुख

‘पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत संबंधितांवर कारवाई करा’; मुख्यमंत्री ‘अ‌ॅक्शन’मोडमध्ये

तरीही सर्वांना पुरून उरले, तो वयाच्या 21 व्या वर्षी सरपंच तर ती 23व्या वर्षी उपसरंच बनली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या