बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुष्पाची क्रेझ संपता संपेना! आता ब्रावोनं केला भर मैदानात ‘पुष्पा’वर हटके डान्स, पाहा व्हिडीओ

मुंबई । अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मीका मंधाना यांचा ‘पुष्पा’ चित्रपट चांगलाच हिट ठरत आहे. सोशल मीडियावरही सध्या पुष्पाची क्रेझ पहायला मिळत आहे. सगळीकडे पुष्पाची धुम पहायला मिळत असताना आता वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन ब्रावो याच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रावो नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास तयार असलेला पहायला मिळतो. आता ब्रावो मैदानामध्ये पुष्पावर धिरकताना दिसला आहे. ब्रावोने व्हिक्टोरियन्सविरूध्द विकेट घेताच भर मैदानात अल्लू अर्जुनच्या डान्सची नकल करत सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचं पहायला मिळत आहे.

ब्रावोचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गराळा घालत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या दिसत आहे. यापूर्वीसुध्दा ब्रावोने त्याच्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीऒ शेअर केला होता. त्यामध्ये तो स्विमिंग पुलाच्या बाजूला श्रीवल्ली गाण्यावरती डान्स करत आहे.

दरम्यान, पुष्पा या चित्रपटातील रश्मीका आणि अल्लू अर्जुन यांची जोडी सर्व प्रेक्षकांना आवडल्याचं दिसत आहे. याशिवाय या चित्रपटातील अॅक्शन, हटके स्टाईल, गाणी, भन्नाट अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

Whasapp New Feature: व्हाॅट्सअॅपचं ‘हे’ नवं फीचर लवकरच होणार लाॅंच

मोठी बातमी! संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना मोठा झटका

“‘टिपू सुलतान’ नामकरणावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे”

‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही’; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार डाॅ. अनिल अवचट यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More