‘जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मी नाही तर…’; एलोन मस्कचं मोठं वक्तव्य
नवी दिल्ली | जगाल्या आपल्या सर्वशक्तीमान सैन्य कारवाईच्या जाणीवेन शांत रहायल्या भाग पाडणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उद्योगपती एलोन मस्क एकमेकांसमोर उभं ठाकले आहेत. एलोन मस्क यांनी पुन्हा एकदा पुतिन यांच्याबाबत एक वक्तव्य केलं आहे.
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मी नसून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सर्वाधिक श्रीमंत आहेत. मला वाटत की पुतिन माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत, असं मस्क म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी पुतिन यांना समोरा-समोर चर्चेचं आमंत्रण दिलं होतं.
पुतिन यांच्या संपत्तीबाबतीत कुणालाच माहिती नाही. अधिकृतपणे त्यांच्याकडे पगार, घरं, राजवाडा आणि काही हेक्टर जमीन आहे. परिणामी मस्क यांनी कशाच्या आधारावर हे वक्तव्य केलं हे मात्र मस्क यांनी स्पष्ट केलेलं नाही.
दरम्यान, एलोन मस्क यांनी खुलेपणानं रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या बाजूनं उभं राहाण्याचा निर्णय घेतला आहे.
थोडक्यात बातम्या –
“उद्धव ठाकरे भाग्यवान माणूस, मला त्यांची कुंडली पहायची आहे”
“मला वाटतं खूप काहीतरी होणार आहे”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ
“अजितदादा तुम्हीच राज्य चालवताय, मुख्यमंत्री कधीतरी दिसतात”
राजमौलींच्या ‘RRR’ची बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्याच दिवशी मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड
“संजय राऊतांचं ‘हे’ वक्तव्य म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे”
Comments are closed.