बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सैन्य भरती परीक्षेचा पेपर फुटला, पोलिसांनी केली ‘ही’ धडक कारवाई

पुणे | 28 फेब्रुवारी रोजी सैन्यभरतीसाठी देशभरात परीक्षा होणार होती. मात्र, सैन्य भरतीचे पेपर आदल्या दिवशी फुटणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी छापेमारी केली. त्यांनी दोन ठिकाणी समांतर कारवाई केल्यानंतर, विश्रांतवाडी पोलिसांनी पोलिस ठाण्यात आतापर्यंत एकूण 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सैन्य भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी राज्यात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी या पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पुण्यातील बारामती येथेून एकाला अटक करण्यात आली आहे. तर अचानक पेपर फुटल्यामुळे देशभरात होणाऱ्या सैन्य भरतीचा पेपर सरकारला रद्द करावा लागला आहे.

पोलिसांनी सापळा रचून गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन ठिकाणी चौकशी केली आणि एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचं कळतंय.

सेवानिवृत्त अधिकऱ्याच्या मुलाने याबाबत तक्रार दिली होती. पेपर होण्याच्या आदल्या दिवशी पेपर फोडून ते उमेदवारांना पुरवणार असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एकूण 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याबाबत रात्र उशिरापर्यंत पोलिसांचा तपास सुरु होता.

थोडक्यात बातम्या

‘पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी इतके कोटी रूपये घेतले’; शांता राठोडांचा मोठा गौप्यस्फोट-

शिवसेनेचा आणखी एक नेता भाजपच्या रडारवर?; किरीट सोमय्यांच्या त्या ट्विटने खळबळ

संजय राऊतांनी केलं राहुल गांधींचं कौतुक, म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फारच सरळमार्गी नेते आहेत”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More