बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या कार्यालयात; त्यांचा ‘उजवा हात’ मात्र कृष्णकुंजवर!

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. राज चौकशीसाठी निघाल्यानंतर त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांना धीर देण्यासाठी मनसेचे दोन दिग्गज नेते कृष्णकुंजवर दाखल झाले.

मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंच्या सोबत असणारे मनसेचे आक्रमक नेते बाळा नांदगावकर राज ठाकरेंच्या घरी गेले. ते राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेत, मोर्चात आणि आंदोलनात त्यांच्यासोबत असतात. आज ईडी चौकशी दरम्यानही ते राज ठाकरेंचं मनोबल वाढवण्यासाठी कृष्णकुंजवर दाखल झाले.

मनसेची ध्येयधोरण ठरवण्यापासून ते राज ठाकरेंच्या आक्रमक भाषणांच्या तयारीपर्यंतची महत्वाची जबाबदारी पेलण्यापर्यंत त्यांची साथ देणारे अनिल शिदोरे हे देखील बाळा नांदगावकर यांच्या पाठोपाठ कृष्णकुंजवर पोहोचले.

दरम्यान, राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार ईडी कार्यालयाबाहेर न जाता बाळा नांदगावकर आणि अनिल शिदोरे यांनी कार्यकर्त्यांनाही पक्षादेशाचं पालन करण्याच्या सुचना दिल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More