बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्या अंगावरून गाडी घाला’; पुण्यात भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

पुणे | सध्या पुण्यातील एक व्हिडीओ सगळ्यांचं चांगलंच लक्ष वेधून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका तरुणीनं मद्यपान करुन भररस्त्यात चांगलाच राडा घातला असल्याचं समजत आहे. असे मद्यपान करुन राडा घातलेले अनेकांचे व्हिडीओ आत्तापर्यंत समोर आलेले आहेत.

मद्यपान करुन भररस्त्यात राडा घातलेली ही घटना पुण्यातील हिराबाग चौक परिसरातील असल्याचं समोर येत आहे. एका तरुणीनं मंगळवारी मध्यपान करुन रात्रीच्या वेळी रस्त्यात धिंगाणा घातला. त्यामुळे तेथील रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहकांचा चांगलाच गोंधळ उडून गेला.

रात्री साडेदहाच्या सुमारास या तरुणीनं भररस्त्यात वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला. नशेत असल्यानं माझ्या अंगावरुन गाडी घाला, असंही तरुणी ओरडत होती. यानंतर रस्त्यावर नागरिक जमा झाले. काही नागरिकांनी तिला हटवण्याचाही प्रयत्न केला मात्र ती कोणाचंही ऐकत नव्हती.

दरम्यान, काही नागरिकांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांच्या कानावर टाकला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर तरुणी त्यांच्यासोबत बाजुला आली. पोलिसांनी तिला स्टेशनला नेत या घटनेविषयी चौकशी करण्यास सुरुवात केली. अद्याप या तरुणीचं नाव समोर आलेलं नाही.

थोडक्यात बातम्या –

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?; केंद्रीय पथक तातडीने पुण्यात दाखल

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक!

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला मोठा धक्का! पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

शिवसेनेला मोठा धक्का! तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री राहिलेल्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More