बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आज…देवेंद्र फडणवीसांच्या घाशिराम कोतवालाचा नवा प्रयोग पहायला मिळाला”

मुंबई | आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पुणेरी पगडी की फुले पगडी? यावरुन झालेल्या वादावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. पदवीदान समारंभात पुणेरी पगडीवरून गोंधळ झाला आहे.

तो एक नाना फडणवीसांचा घाशीराम कोतवालाचा प्रयोग होता आणि आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देवेंद्र फडणवीसांच्या घाशिराम कोतवालाचा नवा प्रयोग पहायला मिळाला, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

आज पदवीदान समारंभात पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडीचा वापर पदवीदान समारंभात करण्यात यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं यावर्षीपासून पदवी स्विकारण्यासाठी नवा पोशाख निश्चित केला आहे.

https://twitter.com/RVikhePatil/status/1083686997376593920

महत्वाच्या बातम्या-

-अमित ठाकरेंच्या लग्नाचं राहुल गांधींना निमंत्रण; नरेंद्र मोदींना मात्र नाही!

-अजित पवार नव्हे शिरुरमधून श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार?

-विषाची बाटली आणा, तुम्ही अर्धी प्या, मी अर्धी पितो; भाजप आमदाराचा अजब सल्ला

-अजित पवार नव्हे शिरुरमधून श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार?

-…तर कोल्हापूरात चंद्रकांत पाटील विरूद्ध धनंजय महाडिक अशी लढत! 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More