Top News

…म्हणून रात्री साडेबारा वाजता विखे-पाटलांचा सभागृहात ठिय्या!

नागपूर | बोंडअळी, मावा आणि तुडतुड्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी रात्री सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. 

ठाम घोषणा झाल्याशिवाय आपण सभागृहाबाहेर पडणार नाही, असा इशारा विखे पाटील यांनी दिला होता. सोमवारी रात्री उशिरा 12.15 च्या सुमारास विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर विखे-पाटील यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डझनभर आमदार सभागृहातच ठिय्या मांडला. 

दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट आणि गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी विरोधकांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. अखेर मंगळवारी सभागृह सुरु होताच यासंदर्भात घोषणा करण्याची शब्द मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन दिला.

महत्त्वाच्या बातम्या–

-मनुस्मृतीचा अभ्यास करुन बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली- संभाजी भिडे

-होय… भूगोलाच्या पुस्तकात गुजराती मजकूर छापण्यात आला, संबंधितांवर कारवाई करणार!

-…तर येत्या निवडणुकीत महादेव जानकराचं डिपाॅझिट जप्त करू!

-जानकरांच्या तालुक्यातही दूध आंदोलन तीव्र; जानकरांचा पुतळा जाळला!

-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या