नागपूर महाराष्ट्र

शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील

नागपूर | शिवसेनेचा न पटणाऱ्या नवऱ्याबरोबर संसार सुरू आहे, त्यामुळे शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपने नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची अब्रू काढली, तरी त्यांना न पटणाऱ्या नवऱ्याबरोबरच संसार करायचा आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, सुरुवातीपासूनच विरोधकांनी सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वीच्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या