बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नगरमधील एका बड्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार- राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर |  गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीतील सरकारमधील नेते आणि भाजप नेते ईडी आणि सीबीआय कारवाई वरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका बड्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, असा इशारा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता दिला आहे.

“अहमदनगर जिल्ह्यातला एक बडा मंत्री आहे. त्याने किती मोठ्या प्रमाणात महसुल गोळा केला, हे देखील समोर येणार आहे”, असं विखे पाटील म्हणाले आहेत. श्रीरामपुर येथे वयोवृद्धांसाठी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची पापे भरली आहेत. आपली पापे झाकण्यासाठी ईडी आणि सीबीआय यांच्यावर दोषारोप करण्याचं काम सुरू आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळली आहेत, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांना पक्षात किती किंमत आहे, हे लोकांना माहिती आहे. ज्यांना सरकारमध्ये आणि पक्षात किंमत नाही त्यांच्याबद्दल काय बोलणार, असं म्हणत विखे पाटील यांनी थोरांतावर निशाणा साधला आहे. सर्व नगरपालिका पुर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

    थोडक्यात बातम्या- 

आरोग्य विभागाच्या वादात मंत्री बच्चू कडू यांची उडी, राज्य सरकारला दिला घरचा आहेर

बाबा राम रहीमसह अन्य पाच साथीदारांना न्यायालयानं ठोठावली ‘ही’ मोठी शिक्षा

नेटफ्लिक्सच्या स्क्विड गेमने मोडले सारे रेकॉर्ड्स! तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्सची कमाई

काय सांगता! विमानाच्या इंधनाची किंमत पेट्रोलपेक्षाही स्वस्त; काय आहे कारण?

‘मुलगा 18 वर्षाचा झाला असेल तर…’; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More