बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार, फक्त वेळेचा प्रश्न आहे”

पुणे | महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही. चालणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे. फक्त वेळेचा प्रश्न आहे, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नाही. हे सरकार काही करेल असं वाटत नाही. त्यामुळे आता मीच सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्याची तयारीही सुरू केली आहे, असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर सरकारने प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी होती. मात्र ते न करता राज्य सरकार सर्व काही केंद्र सरकारवर ढकलंत आहे. काहीही झालं की केंद्र सरकारवर ढकलायचं ही आता फॅशन झाली आहे. त्यामुळेच मी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असं विखे-पाटील म्हणाले. सरकारच्या अनास्थेमुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं. ओबीसी आरक्षणाचंही तेच झालं. त्यामुळे सरकार विरोधात वातावरण आहे. सरकारला हेच करायचं होतं का?, असा सवालही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यातील आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत आहे. त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत भाजप निर्णय घेईल, असं विखे-पाटील यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

सीताच्या भूमिकेसाठी करीनाने मागितलं होतं ‘इंके’ मानधन, तापसीनं केली बेबोची पाठराखण

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! तरूण शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून बनवलं पेरणी यंत्र

‘मी 10 हजारांची फौज घेऊन येईन, एका फटक्यात सरळ करेन’; शिवसेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

“संभाजी भिडे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल करावा”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More