सुजय विखेंच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे पाटलांची सांकेतिक भाषा

श्रीगोंदा |  नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवर सुजय विखेंच्या विजयासाठी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी सांकेतिक भाषा वापरायला चालू केले आहे. 

मी काय बोलतो हे टिपण्यासाठी चारही बाजूंनी कॅमेरे आहेत. त्यामुळे मी तुम्हाला फक्त भेटायला आलोय. तुम्ही सोबत असल्यावर मला चिंता नाही, असं विखे पाटील म्हणाले आहेत.

विखे पाटील श्रीगोंदा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी या दौऱ्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतल्या.

दरम्यान, विखे पाटलांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार या सगळ्या अफवा आहेत, असंही त्यांनी स्वत:  सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

भाजपला मोठा धक्का, 2 मंत्री आणि 8 विद्यमान आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी!

…आणि टीव्हीवरील चर्चेदरम्यान भाजप-राष्ट्रवादीचे नेते भिडले, पाहा व्हीडिओ

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; आता ही महिला नेता करणार भाजपत प्रवेश?

-राष्ट्रवादीला धक्का, अखेर रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला भाजपमध्ये प्रवेश!

कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला!