मुंबई | लॉकडाऊनंतर अभिनेता सलमान खानने अखेर चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुरुवात केलीये. तब्बल साडेसहा महिन्यांनंतर त्याने शूटिंगला सुरुवात केली आहे.
सलमानचा आगामी सिनेमा ‘राधे’ या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून सलमान त्यात मुख्य भूमिकेत आहे. यासंदर्भात सोशल मिडीयावर पोस्ट करत सलमान म्हणाला, “साडेसहा महिन्यांनंतर शूटिंगला सुरुवात केली आहे. बरं वाटतंय…”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची शूटिंग अर्धवट ठेवण्यात आली होती. आता अनलॉकदरम्यान सर्व नियमांचं पालन करत शूटिंगला सुरुवात करण्यात आलीये.
महत्वाच्या बातम्या-
“संघाचं नेतृत्व करण्यासाठी इंग्लिश बोलता येणं गरजेचं नाही”
“गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता, पण…”
मृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोनाची भीती नष्ट करा- नाना पटोले
“…त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत?”